ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने दुचाकीला दिली धडक

दुचाकीचा चेंदामेंदा - सुदैवाने बाप लेक बचावली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजरी येथील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी विलास दुर्गा प्रसाद खस (३४) हे माजरी येथील रहिवासी असून ते शाळेतून आपल्या दोन मुलांसह होंडा शाइन एमएच ३४ बीएन ५१८४ या गाडीने घरी जात होते. जात असत्तांना बाजारपेठेतील ताज किराणा दुकाना समोरून येणाऱ्या TS 05 UB 2002 क्रमांकाच्या युद्धसामग्री ट्रक ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चेंदामेंदा झाली तर मुले व विलास खस हे दोघेही वेगवेगळ्या दिशेने पडल्याने सुदैवाने बचावले. यावेळी माजरी येथील मुख्य बाजार रस्त्यावरील दुकानदारांनी मोर्चा काढला. या अतिक्रमणामुळे दररोज किरकोळ अपघात घडत असुन सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन तातडीने अतिक्रमण काढण्याची गरज असल्याचे जनसामान्याकडून बोलले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये