ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कुल व्हॅन / स्कुल बस धारकांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घ्यावे

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा यांच्याकडून आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयातील सर्व स्कुल व्हॅन / स्कुल बस धारकांना या प्रसिध्दीपत्रकाव्दारे आवाहन करण्यात येते की, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण न केलेल्या स्कुल बस / स्कुल व्हॅन धारकांना सुट्टीच्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी या सुविधेचा लाभ स्कुल व्हॅन / स्कुल बस धारकांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याकरीता करुन घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा यांच्याकडुन करण्यात येत आहे.

मो समीर मो. याकूब

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये