ताज्या घडामोडी

विष प्राशन करून १६ वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

केंद्रीय विद्यालयात दहाव्या वर्गात घेत होता शिक्षण

चांदा ब्लास्ट :अतुल कोल्हे भद्रावती :-

तालुक्यातील घोडपेठ येथील एका १६ वर्षिय विद्यार्थ्यांने विष प्राशन करूनआत्महत्या केल्याची घटना दि. ११ रोज सोमवारला मध्यरात्रीनंतर घडली.

साहिल सुनील ठक वय १६ वर्षे असे या मृतकाचे नाव असून तो भद्रावती शहरातील निर्माणी वसाहतीतील केंद्रीय विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी होता. मृत्यूचे कारण मात्र कळू शकले नाही.

मृतक साहिल हा मूळचा कोलगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी होता. तो घोडपेठ येथील आपल्या आजीकळे राहून शिक्षण घेत होता. साहिल याने घटनेच्या मध्यरात्री विष प्राशन केले व स्लॅबवर गेला व तेथेच त्याचा मृत्यू झाला. सदर घटना सकाळी उघळकीस आली. तो स्लॅबवर मृतावस्थेत आढळून आला. आपल्या आत्महत्येस कोणिही जबाबदार नसल्याचे त्याने आपल्या सुसाईट नोटमधे लिहले असल्याचे पोलिसांनी सांगीतले. भद्रावती पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असुन घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये