प्रमोद मशाखेत्रीची महाविद्यालयातून परिक्षेत बसलेल्या २८परिक्षार्थीमधून प्रथम येण्याचा मानमहाविद्यालयातून परिक्षेत बसलेल्या २८परिक्षार्थीमधून प्रथम येण्याचा मान
चांदा ब्लास्ट :
मूल शहरात तहसील कार्यालय परिसरात आपले सरकार केंद्रचालक म्हणून आनलाईन ची कामे करणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रमोद मशाखेत्रीची शिक्षणाची आवड व नवीन काहीतरी करण्याची धडपड पुन्हा एकदा यशस्वीरीत्या पार पडली असून प्रमोदने, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाची तिन वर्षांची पदवी परीक्षा उत्तिर्ण केली असून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर चे ते विद्यार्थी होते.
या महाविद्यालयातून परिक्षेत बसलेल्या २८परिक्षार्थीमधून प्रथम येण्याचा मानही प्रमोदने पटकावला असून नगरातील गुणवंतांच्या रांगेत स्थान मिळवले आहे. प्रमोद,यापूर्वी आनलाईन केंद्र चालवत असतानाच आपल्यासोबत कित्येक गरजू व होतकरू तरुणांना आपल्यासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका वठवित असून आजपावेतो शेकडो तरुणांना त्यांनी प्रशिक्षित करुन नौकरी व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रमोदची वाचनाची आवड, आणि संगणकावर बसल्यावर जनतेच्या समस्या लक्षात घेता त्या समस्या प्रशासनासमोर मांडण्यासाठी तक्रारी लिहून देता देता पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण कधी झाले हे कुणाला कळलेच नाही, आज PMdigitalnews नावाने स्वतःचे वेबपोर्टल ते चालवत असून शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांना माहिती करुन देण्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहे, याच कारणासाठी उपविभागीय अधिकारी मूल यांचे हस्ते मागील वर्षी स्वातंत्र्यदिनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
अशा या आमच्या बहुआयामी अवलिया मित्राने आजवर गोंडवाना विद्यापीठाच्या एम. ए., एम.एड., नागपूर विद्यापीठाची बि.एड. व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर येत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या या | धडपड्या व साहसी युवकाचे करावे तेवढे कौतुक कमीच असणार आहे, मात्र स्वतःच्या मनमिळाऊ स्वभावाने जग जोडण्याची किमया हा तरुण करतोय