Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अल्ट्राटेक आवारपूर द्वारा नागपुर येथे आयोजित महिला शेतकरी सहल मध्ये १२ गावातील ४७ महिला शेतकऱ्यांचा समावेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपुर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील महिला शेतकऱ्यांना शेती बाबत आधुनिक तंत्रज्ञान बद्दल अवगत करण्याकरिता शिवाय पाश्र्चिमात्य देशातील तांत्रिक शेती बद्दल विविध तंत्राचा, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची ओळख परिसरातील महिला शेतकऱ्यांना शेतीची उत्पादकता वाढावी परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी या उद्देशाने आवारपुर, बिबी, नांदा, नोकारी, पालगाव,राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, बाखर्डी, तळोधी, हिरापूर व सांगोळा गावातील ४७ महिला शेतकऱ्यांनी नागपूर येथील ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीला दिनांक २४ नोव्हेंबर रोजी भेट दिली.

या माध्यमातून महिला शेतकरी यांना विविध प्रात्यक्षिकांची अणूभुती आणून देण्यात आली. कंपनीच्या वतीने नमीत मिश्रा (एफ.एच.- एच.आर) व नारायण दत्त तिवारी (एच.ओ.डी. – ई .आर.) यांच्या मार्गदर्शनाखाली सी.एस.आर. विभाग प्रमुख, प्रतीक वानखेडे व संजय ठाकरे यांनी सदरचा उपक्रम यशस्वीरित्या राबविला. त्यासाठी सदर महिला शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये