ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘शासन आपल्या दारी’ – मेळाव्यात महावितरणचे स्टॉल

विविध योजनांची माहिती व नवीन विजजोडण्याचे वितरण

चांदा ब्लास्ट

गडचिरोली येथे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व उपमख्यमंत्री मा. अजिदादा पवार यांच्या उपस्थितीत,दि. ०९/०७/२०२३ ला दुपारी १ वा. गडचिरोली कोटगल एम.आय. डी. सी. मधील पोलिस क्रीडांगणावर आयोजित, “शासन आपल्या दारी” पर पडले. मेळाव्यात, मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. त्यांना विविध प्रकारच्या योजेनांचा लाभ, दाखले व धनादेश मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

या मेळाव्यात महावितरणद्वारा लावण्यात आलेल्या माहितीपर स्टॉलला जनतेने व शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने भेट ‍दिली व माहिती जाणून घेतली. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारा -शेतीविषयक सुरक्षा उपाय योजना, कॅपॅसिटरच्या वापरातून होणारे फायदे, सुरक्षा, मोबाईल एपचा वापर करून वीजबिल भरण्याची सोय, सौर कृषि पंप योजना, गो ग्रीन सूट, सोलर रुफटॉप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजणा २.० मिशन २०२५ इत्यादी योजना बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे व गडचिरोली मंडळाचे अधिक्षक अभियंता (प्रभारी)मा. रविंद्र गाडगे यांनी मेळाव्या स्थळी स्टॉलला भेट देऊन लाभार्थीना वीज मीटर व प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव केला.एन. एस. सी. स्कीम मधून २० वीज मीटर / विजजोडण्या, रुफ टॉप सोलर चे १० वीज मीटर / विजजोडण्या व ५कृषीपंप व २सौर कृषीपंप वीज मीटर / विजजोडण्या देण्यात आल्या.

गडचिरोली विभागाचे कार्यकारीअभियंता.श्री.डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात उप कार्यकारी अभियंता.श्री. दिलीप कुंभरे, श्री. मुरकुटे, सहा. अभियंता श्री. कोल्हटवार यांनी महावितरणच्या विविध ग्राहकोपयोगी उपक्रमाबद्दल भेट देणाऱ्यांना माहिती दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये