ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठावरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार,केंद्रप्रमुख विलास देवाळकर,विकास अवघडे,प्राचार्या निर्मला ठावरी,चंदू आकनुरवार आदी मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलनाची गरज आहे. केंद्रप्रमुख विलास देवाडकर यांनी शालेय शिक्षणाच्या विकासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही महत्त्वाचे असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषण जगदीश ठावरी यांनी केले. प्रास्तविक प्राचार्या निर्मला ठावरी यांनी केले या कार्यक्रमाला मोठया संख्येनी विध्यार्थी,पालक, शिक्षक उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा,तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये