ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘प्रगत भारत’ घडवायचा असेल तर महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज – कर्नल समिक घोष 

एन.सी.सी. तर्फे 'महिला दिना'निमित्त 10 महिला अधिकारी व प्राध्यापक सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत पण अजूनही पाहीजे तेवढे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे तसेच आजही पारंपारिक सामाजिक बंधनात अनेक स्त्रीया अडकल्यामुळे प्रगती मंद प्रमाणात आहे. म्हणूनच ‘प्रगत भारत’ घडवायचा असेल तर महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियनचे कमान अधिकारी कर्नल समिक घोष यांनी स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिट तर्फे आयोजित ‘राष्ट्रीय महिला दिन’ कार्यक्रमात 13 फेब्रुवारी रोजी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून एन.सी.सी. कमाडंट कर्नल समिक घोष, एन.सी.सी. अधिकारी तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर व सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश यावले उपस्थित होते.

राष्ट्रीय महिला दिनांनिमित्त 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन अंतर्गत एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय छात्र सेना युनिट तर्फे ‘उत्कृष्ट महिला अधिकारी’ पुरस्कार स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली अवथळे व एन.सी.सी. बटालियनच्या महिला छात्र सैनिक प्रशिक्षक साधना पाल यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली अवथळे यांचा सत्कार करताना कर्नल समिक घोष, कॅप्टन मोहन गुजरकर, प्राचार्य डॉ. ढाले व अन्य…

या प्रसंगी महिला प्राध्यापक मेघा फासगे, प्रा. डाॅ. निलीमा बर्गट, प्रा. पुनम ठाकरे, प्रा. स्वाती पातुरकर, प्रा. मनीषा किटे, प्रा. ममता पिलेवान, प्रा. वंदना तलमले व प्रा. डाॅ. सुनिता गजभिये यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

महिला दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी करून स्वातंत्र्य सेनानी तथा गान कोकीळा सरोजिनी नायडू यांच्या जीवनकार्याचा परिचय दिला. सूत्रसंचालन अंडर ऑफिसर राखी खोडे व सार्जंट नैना गवळी यांनी तर आभार कॅडेट कोमल शितळे हिने मानले.

यशस्वीतेकरीता सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर, अंडर ऑफिसर अक्षय जबडे, प्रतीक क्षीरसागर, प्रशिल अंदुरकर, साहील रामगडे, रितेश बुटे, सौरभ साव, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी केले.

महिला दिन समारंभाची सांगता ‘हम सब भारतीय है………’ या एन.सी.सी. गीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये