ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हयातील हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाउस, संस्था व विद्यापीठातील विदेशी नागरीकांचे कामकाज पहाणारे यांना पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अलीकडच्या काळात विदेशी नागरीकांकडुन बरेचसे गैरकृत्य केल्याचे घटना निदर्शनास आल्याने व नुकतेच दोन नायजेरीयन विदेशी नागरीक यांनी नागरी बॅकेचे सायबर फाड केल्याचे घटनेचे पार्श्वभुमीवर आज दिनांक ०५/०७/२०२३ रोजी मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. नुरुल हसन यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हयात ज्या ठिकाणी विदेशी नागरीक येतात असे हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाउस, संस्था व विद्यापीठातील समन्वयक यांची पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे कक्षात बैठक घेण्यात आली.

बैठकीमध्ये त्यांना विदेशी नागरीक त्यांचेकडे आल्यास त्यांनी effro च्या साईटवर जावुन सि फॉर्म भरण्याबाबत तसेच विदेशी नागरीक परत गेल्यावर सुध्दा त्यांचे सि फॉर्म भरण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्या विद्यापीठात विदेशी नागरीक हे शिक्षणाकरीता येतात व थांबतात त्यांना सि फॉर्म सोबत एस फॉर्म भरण्याबाबत सुध्दा मार्गदर्शन करुन सबंधीत सि फॉर्म ची प्रत व त्या सोबत पासपोर्ट व्हिजाची कॉपी हे २४ तासाचे आंतमध्ये जवळील पोलीस स्टेशन व विदेशी नागरीक नोंदणी अधिकारी यांना देण्याबाबत सुचना देण्यात आल्या.

सदर बैठकीत सेवाग्राम मेडीकल कॉलेज, सेवाग्राम आश्रम, यात्री निवास, नई तालीम, हिंदी विश्वविद्यालय, सावंगी मेडीकल कॉलेज, अग्रगामी शाळा, गीमा टेक्सटाईल, राज सिंग दुंगरपूर मेमोरिअर फाउंडेशन तळेगांव येथील पदाधिकारी व समन्वयक तसेच ११ हॉटेल चे संचालक असे उपस्थित होते …

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये