आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय समाजात डॉक्टरला देवाचे स्थान – डॉ.महावीर सोईतकर

चंद्रपूर रोटरी क्लबच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १९ डॉक्टरांचा सत्कार

चांदा ब्लास्ट 

चंद्रपूर : भारतीय समाजात डॉक्टराला देवाचे स्थान आहे. डॉक्टरांनी सेवाभावी वृत्ती ठेवून रूग्णांची सेवा केली पाहिजे, या व्यवसायात येणाऱ्या तरूण डॉक्टरांनी निस्वार्थ सेवा हा मंत्र कायम स्मरणात ठेवून या व्यवसायात पाऊल ठेवावे असे प्रतिपादन येथील ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ.महावीर सोईतकर यांनी केले.
रोटरी क्लब चंद्रपूरच्या नविन कार्यकारिणीची सुरूवात १ जुलै रोजी झाली. यानिमित्त ४ जुलै रोजी रोटरीच्या वतीने डॉक्टर डे व चार्टर्ड अकाऊंटट्स दिन साजरा करण्यात आला. येथील एन.डी.हॉटेल मध्ये आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ.महावीर सोईतकर होते. मंचावर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष शफीक अहमद, माजी कुलगुरू तथा कन्यका बँकेचे अध्यक्ष डॉ.विजय आईंचवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव, सचिव कुंजबिहारी परमार उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.महावीर सोईतकर यांनी त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव कथन करतांना, आज डॉक्टर पैशाच्या मागे धावत असले तरी समाजात बहुसंख्य डॉक्टर अजूनही सेवाभाव म्हणूनच वैद्यकीय सेवा करित आहेत. त्यामुळेच आज ही भारतीय समाजात डॉॅक्टरांना देव मानल्या जाते असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ.विजय आईंचवार, शफीक अहमद, अनुप यादव यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी डॉ.डॉ.गोपाल मुंधडा, डॉ. अशोक वासलवार, डॉ.रेखा दांडेकर, डॉ.बालमुकूंद पालिवाल, डॉ. सुशील मुंधडा, डॉ.आसावरी देवतळे, डॉ. विजय देवतळे, डॉ. परिणीता ओस्वाल, डॉ.अप्रतिम दिक्षित, डॉ.सिमला गाजर्लावार, डॉ. विनिता दिक्षित, डॉ.प्रियंका हासानी, डॉ.कुणाल परमार, डॉ.रोहण आईंचवार, डॉ.लक्ष्मीनारायण सरबेरे, डॉ.प्रति सरबेरे, डॉ.राम भारत, डॉ.प्रवीण घोडे, डॉ.नसरिन मावानी या डॉक्टरांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरव करण्यात आला. यावेळी चंद्रपूर रोटरी क्लबचे वतीने डॉ. सोईतकर यांच्या सत्कार करण्यात आला. डॉ. कार्यक्रमात बहुसंख्य मान्यवर सहभागी झाले होते. प्रास्ताविक अनुप यादव यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रदिप पवार यांनी तर आभार कुंजबिहारी परमार यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये