गुन्हेमहाराष्ट्र

युवकाने विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

चांदा ब्लास्ट :

शेगाव बु मधील दुर्गेश बंडू बावणे वय २५ वर्षे या युवकाणे काल रात्री विहारित उडी घेत आपली जिवन यात्रा संपवली आहे.  कुटुबीयांनी दिलेल्या माहिती नुसार दुर्गेश हा मजुरी करुन आपल्या उदरनिर्वाह करीत असत सदर युवक हा अविवाहित असून त्याला पोटाचा त्रास होता. काल दि. ४ जुलै ला रात्री अचानक तो घरून निघून गेल्याने घरच्यांनी त्याचा सगडीकडे शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्या मुळे घरचे निराश होऊन घरी परतले व आज सकाळी परत शोध घेण्याला सुरुवात केली असता घरा पासून काही अंतरावर असलेल्या राम मंदिर परिसरातील विहीरिमध्ये तो मृत अवस्थेत आढळून आल्याने घरच्यावर दुखाचा डोंगरच कोसळला.

घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशन ला मिळताच घटनास्थळ गाठून बॉडी ला विहीरिबाहेर काडून पंचनामा करुन पोस्टमॉटरम करण्यासाठी उपाजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आले.घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशन  ठाणेदार अविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात पोलीस शिपाही मदन येरमे, अतुल कनवटे हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये