ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार गजानन पाटील जुमनाके यांनी शक्तिप्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

राजुरा :- विधानसभा क्षेत्रात गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार गजानन पाटील जुमनाके यांनी काल शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

हजारोंच्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जुमनाके यांची राजुरा येथील सम्राट मंगल कार्यालयामध्ये जाहीर सभा पार पडली, याप्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडीचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार गजानन पाटील जुमनाके यांना विजयी करण्याचा संकल्प केला.

राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये नव्या चेहऱ्याला संधी देऊन क्षेत्राचा चौफेर विकास साध्य करण्यासाठी गजानन पाटील जुमनाके यांना विजयी करण्याचे आवाहन या प्रसंगी मान्यवरांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये