क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी दारुचा साठा

दोन चारचाकी वाहनासह १०० बॉक्स देशी दारू जप्त

चांदा ब्लास्ट

दिनांक 5 जुलै, 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारावरुन गजानन मंदीर वार्ड जवळील गार्डन समोरील एका घरासमोरील दोन संशयीत इसम व त्याचे ताब्यातील वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यातील एका पांढऱ्या रंगाचे डस्टर गाडी क्रमांक एम.एच. १४ डीएन ७५६९ मध्ये व एका पांढऱ्या रंगाचे पोलो कार क्रमांक एम एच ०२ बीवाय ८१५४ या कारचे डिक्की व मागील सिटवर १०० खरडयाचे बॉक्स ज्यात ९० एम.एल. नी भरलेल्या देशी दारु रॉकेट संत्रा कंपनीचे मिळुन आल्याने सदर इसमांना ताब्यात घेवुन नमुद दोन्ही कार व त्यातील देशी दारु असा एकुण २१,१०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनि विनोद भुरले, पोलीस अंमलदार संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, प्रांजल झिलपे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये