ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांस्कृतिक कार्यक्रमात श्री साई कॉन्व्हेन्ट अव्वल

स्वांतञ्य दिन व नगर परिषदेचा रौप्य महोत्सव ; नगरपरिषद भद्रावतीचे आयोजन - सर्व शाळांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नगर परिषद भद्रावती तर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात येथील श्री साई कॉन्व्हेन्ट स्टेंटने तीन तर श्री साई कॉन्व्हेन्ट सी.बी.एस.सीने दोन पुरस्कार प्राप्त करून श्री साई कॉन्व्हेन्ट सांस्कृतीक कार्यक्रमात अव्वल ठरली.

भद्रावती नगर परिषद ने १५ ऑगस्ट २०२३ ला स्वांतञ्य दिन व नगर परिषदेच्या रौप्य महोत्सव वर्षा निमित्त स्थानिक मुरलीधर पाटील गुऺडावार हॉल मध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शहरातील सर्व शाळा महाविद्यालय सहभागी झाले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात श्री साई कॉन्व्हेन्ट ने पूर्व प्राथमिक गट यु के जी च्या लहान बालकांनी सादर केलेल्या देशभक्ती पर सामुहिक नृत्याला व्दीतीय पुरस्कार मिळाले. वर्ग १ ते ४ या प्राथमिक गटात आझादि का अमृत महोत्सव या सामुहिक नृत्याला प्रथम पुरस्कार,वर्ग ८ ते १० या माध्यमिक गटात मुला मुलींनी सादर केलेल्या पुलवामा अँटक मुक नृत्याला व्दितीय पुरस्कार मिळाले तर श्री साई कॉन्व्हेन्ट सी.बी.एस .सी . या शाळेने वर्ग. १ ते ४ या प्राथमिक गटात मेरा जुता हैं जापानी या सामुहिक नृत्याला व्दितीय पुरस्कार तर वर्ग ८ते १० या माध्यमिक गटात
वऺदे मातरम् या क्लासिकल सामुहिक नृत्याला प्रथम पुरस्कार मिळाले. या सर्व सामुहिक देशभक्तीपर नृत्याचे बक्षीस वितरण नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी,न .प.उपाध्यक्ष सऺतोष आमने, नगर सेवक प्रफुल्ल चटकी, नगर सेविका सौ.खुटेमाटे तथा आदि नगरसेवक यांच्या शुभहस्ते संन्मान चिन्हं व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व विजेत्यांचे मुख्याध्यापक अतुल बडकेलवार, मुख्याध्यापिका कु.किरण कोथळे, संस्था अध्यक्ष प्रा.अतुल गुऺडावार, यांनी सर्वांचे स्वागत केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये