अज्ञाताकडून मोटरसायकलची चोरी ; सदरचा गुन्हा नोंद
आरोपी अटकेत ; संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 24/06/2025 रोजी दुपारी 12/30 वा दरम्यान फिर्यादी नामे दिपक किसनराव होलगरे वय 51 वर्ष, रा. निसर्ग नगरी, धुनीवाले मठ, वर्धा हे कामानिमीत्य त्याची जुनी वापरती पांढरे रंगाची होन्डा अॅक्टीवा कंपनीची मोपेड गाडी क्रमांक MH32/AA/0083 ची अं.किं. 55,000 रू ही घेवुन जिल्हा व सत्र न्यायालय येथे येवुन मोपेड गाडी न्यायालयाचे गेटचे जवळ उभी ठेवुन गेले असता कुणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांची मोटरसायकल नेली अशी अशी फिर्यादी यांचे तोंडी रीपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास पो.स्टे.चे शोध पथकाने करून गुप्त बातमीदार नेमुन बातमीदार कडुन मिळालेल्या माहीतीवरून आरोपी. विजय काशीराम चिचाम, वय 38 वर्ष, रा. वार्ड नं. 04, शांतीनगर, सिंदी मेघे वर्धा यास अटक करून त्याचे कडुन गुन्हयात चोरीस गेलेली फिर्यादीची जुनी वापरती पांढरे रंगाची होन्डा अॅक्टीवा कंपनीची मोपेड गाडी कमांक MH32/AA/0083 ची अं.किं. 55,000 रू चा माल जप्त केला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच पो.स्टे. वर्धा शहर चे ठानेदार श्री पराग पोटे, पो.उप.नि. शरद गायकवाड, यांचे निर्देशनाप्रमाणे पो.स्टे. वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विजय पंचटिके ब.नं. 747, पो.हवा. महेन्द्र पाटील ब.नं. 523, पो.हवा. शैलेश चाफलेकर, ना.पो.शि. पवन लव्हाळे ब. नं. 1318, पो.शि. शिवदास डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.