मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी स्वतः विद्यार्थ्यांना सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये शाळेत आणले
सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
विदर्भात शाळा सुरू झाली.शाळेच्या पहिल्या दिवशी पालिकेच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना फुग्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये बसवून स्वतः ट्रॅक्टर चालवत नगरपरिषद देऊळगाव राजा चे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकापासून ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना आणले सोबत विद्यार्थ्यांची प्रवेशोत्सव दिंडी, वाजंत्री वाद्य, आणि विद्यार्थी शिक्षक पालक समितीचे सदस्य सहभागी झाले होते. शाळेत आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले . शाळेत उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
शुभेच्छुक दिंडी ही शाळेत आल्यानंतर मुख्याधिकारी मोकळ यांच्या अध्यक्षतेमध्ये व पालक समिती सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे मुख्याधिकारी व मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश वितरित करण्यात आले.प्राथमिक शाळेचे शिक्षण घेऊन विविध शाळा व महाविद्यालयात गुणवंत ठरलेल्या प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी व पालकांचे सन्मानचिन्ह व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमास पत्रकार सुरज गुप्ता,मंगेश तिडके, युनूस खान,पालक समितीचे अध्यक्षा मेघा भालेराव, उपाध्यक्ष रामदास गुरव, सदस्य अश्विनी देवउपाध्ये, शे हुमा शे अजीज, पल्लवी वाचपे, प्रवीण कुलथे, गजानन वाघमारे, सचिन झिने ,आदी हजर होते.
अध्यक्ष मनोगतामध्ये मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी सांगितले की पालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येते . अनुभवी शिक्षक वर्ग आहे . मी पालकांना विश्वास देतो की आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण येथे मिळेल .प्राथमिक शाळेच्या ईमारत बांधकाम हे जलद गतीने सुरू आहे . आपल्या पाल्यांना येथे गुणवत्ता पूर्ण वदर्जेदार शिक्षण मिळेल असे सांगितले
वर्षोत्सव कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी मोकळ यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका आरती राजमाने, प्रतिभा लोंढे, संगीता कुमठे, जिजा जेठे, उर्मिला वाघ, मंगल गाडगे, संगीता देवकर, रिता वाघ,अनंता सानप, सतीश पिंपळे, निलेश गाडे, आदी शिक्षकांनी केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका आर्थी राजमाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल गाडगे सर व आभार प्रदर्शन पालक समिती सदस्य सुरज गुप्ता यांनी केले .सदर कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांची उपस्थितीत होते.