ताज्या घडामोडी

जुगार अड्यावर पोलिसांची धाड

ग्रामपंचायत सदस्याच्या पतीसह सात आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट : अतुल कोल्हे भद्रावती :-

गुप्त माहितीच्या आधारे माजरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्यावर धाड टाकून ग्रामपंचायत सदस्याच्या पतीसह सात आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून रोख 12,720/- रुपये  2,20,050/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माजरी पोलीस ठाणेदार अजितसिंग देवरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, कुचना गावातील तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या जागेवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.  त्याआधारे पोलिसांनी सापळा रचला.  छापा टाकताना पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल माणिक परचाके यांचे पती प्रफुल माणिक परचाके, कमलेश बळीराम मंगम, मिलिंग नथ्थुजी ताजने, बंडू शंकर घाटे, सारंग शरद महातळे, अनिकेत प्रभाकर ताजणे, कवडू भोजराज अवथरे, सर्व रा. कुचना यांना अटक केली.  पोलिसांनी आरोपींना विचारणा केली

12720/- रोख, मुद्देमालासह रु. 2,20,050/- किमतीचा माल जप्त केला.  माजरी पोलीस ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये