ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धानोली येथे पी एम जनमन धरती आबा उन्नत ग्राम योजने अंतर्गत शिबीर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना – ग्रामपंचायत कार्यालय, धानोली येथे धरती आबा उन्नत ग्राम योजना , पी एम जनमन योजने अंतर्गत आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन दिनांक १८ जून रोजी ग्राम पंचायत धानोली येथे करण्यात आले होते.

त्याअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,रहिवासी दाखला,राशन कार्ड, जनधन बँक खाते, आयुष्यमान भारत कार्ड, पी एम किसान कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, सिकलसेल ऍनिमिया आरोग्य तपासणी, नवीन विद्युत जोडणी,संजय गांधी निराधार योजना,प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी सेवा सदर शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरा करीता कोरपना तहसीलदार पल्लवी आखरे ,गटविकास अधिकारी . विजय पेंदाम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर, धानोली ग्रामपंचायत चे सरपंच वैशालीताई पेंदोर, उप सरपंच ओम प्रल्हाद पवार,माजी सरपंच विजय रणदिवे,ग्रामसेवक अक्षय कुकडे तसेच विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी हे शिबिर स्थळी उपस्थित होते.

सदर शिबिरा दरम्यान मिळालेल्या सेवांबद्दल तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या दाखल्यांबद्दल शिबिरा दरम्यान उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले व मा.प्रधानमंत्री महोदय यांचे सदरचे अभियानाबद्दल आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये