ताज्या घडामोडी

सिकलसेल निर्मूलन अभियान चे उद्घाटन संपन्न

चांदा ब्लास्ट : गडचांदूर

दिनांक 1 जुलै 2023 ला “सिकल सेल निर्मूलन” अभियानांतर्गत माननीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी ,यांच्या हस्ते सदर अभियानाचे दुपारी ३ वाजता ऑनलाईन उद्घाघटन करण्यात आले,त्यावेळी गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी हे ऑनलाईन उपस्थित होते .तत्पूर्वी 35 रुग्णांची सिकल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली, त्यामध्ये 4 सिकल पॉझिटिव्ह आलेले आहे व 21 लाभार्थ्यांचे हेल्थ कार्ड काढण्यात आले. सदर कार्यक्रमात  राहुल  उंमरे नगरसेवक ,नगरपरिषद गडचांदुर  हे उपस्थित होते .उपस्थित जनसमुदायाला सिकलसेल बाबत माहिती देण्यात आली. त्यामध्ये सिकलसेल ऍनिमियाचे वाहक स्त्री किंवा पुरुष यांनी लग्न केल्यास त्यांना पंचवीस टक्के सिकल आजाराचे अपत्य निर्माण होण्याची शक्यता असल्याबाबत सांगण्यात आले.त्याचप्रमाणे सिकल आजाराच्या रुग्णांना वारंवार रक्तपुरवठा करावा लागत असतो व त्यांचे साधारण आयुष्यमान 25 वर्षांपर्यंत असते, याबाबत माहिती देण्यात आली, तरी वाहक स्त्री-पुरुष यांनी  लग्नापूर्वी आपली कुंडली पाहण्या  ऐवजी सिकल तपासणी करणे अनिवार्य असल्याचे विधीत करण्यात आले. त्यावेळी  वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत गेडाम  डॉक्टर कमलेश नाने  ,डॉक्टर मनीषा कन्नाके आयुष, डॉक्टर हेमलता सहारे RBSK,श्रीमती प्रतिभा काळे आधी परिचारिका ,श्रीमती दक्षिणा टेलसे, श्रीकांत नरवडे ब्रदर व इतर कर्मचारी उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय गाठे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये