ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तहसीलदारांच्या हस्ते तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी प्रमाणपत्रांचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारीला तहसीलदार राजेश भांडारकर यांचे हस्ते तालुक्यातील चोरा,खोकरी, सागरा, मासळ, चिचोर्डी तथा तालुक्यातील अन्य शेतकरी बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या ऍग्री स्टॉक योजनेअंतर्गत फार्मर आयडी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या एग्री स्टॉक संकल्पनेच्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक निर्मिती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सदर ओळखपत्र शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या ओळखपत्राचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात वेगवेगळ्या योजनेसाठी होणार आहे.