“रबरी बॉल के खुले सामने” क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप
सानू 11 संघ विजेता ठरला

चांदा ब्लास्ट
घुग्घुस येथे आयोजित बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा “रबरी बॉल के खुले सामने” याचा आज भव्य समारोप झाला. 2 नंबर क्रिकेट क्लब, घुग्घुस यांच्या वतीने आयोजित ही पाच दिवसीय स्पर्धा 5 जूनपासून सुरू झाली होती. ही स्पर्धा बौद्ध विहार, बैरमबाबा रोड, अंसारी ले-आउट, घुग्घुस (ता. जिल्हा चंद्रपूर) येथे खेळवण्यात आली.
विजेता संघ :
प्रथम क्रमांक: सानू 11 क्रिकेट संघ, घुग्घुस – ₹21,000/-
(प्रायोजक : विवेक बोडे)
द्वितीय क्रमांक: 2 नंबर क्रिकेट क्लब, घुग्घुस – ₹15,000/-
(प्रायोजक : रोशन पचारे, जावेद सिद्दीकी, पवन आगदारी)
तृतीय क्रमांक: लोहारा क्रिकेट संघ, चंद्रपूर – ₹11,000/-
(स्व. सागीर सिद्दीकी उर्फ टुनू भाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ)
या बक्षिसांचे वितरण रोशन पचारे, गणेश कुटेमाटे, अमित बोरकर, इरशाद कुरेशी तसेच इतर समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कार :
मॅन ऑफ द मॅच : आशीष अड्डुर (बक्षीस वितरक: अमित बोरकर)
मॅन ऑफ द सिरीज : जाहिद शेख (बक्षीस वितरक: इरशाद कुरेशी)
बेस्ट बॅट्समन : बॅट
मॅन ऑफ द मॅच उपहार : स्मार्ट वॉच
विशेष ट्रॉफी: “प्रणय मोबाइल शॉप” यांच्यावतीने विजेता संघाला
उद्घाटन सोहळा :
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 5 जून रोजी सकाळी 11 वाजता पार पडला. यावेळी मंचावर विवेक बोडे, शरीफ सिद्दीकी, गणेश उईके, अमित बोरकर, साहिल सय्यद, प्रणयकुमार बंडी आणि इरशाद कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहिल सय्यद यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशस्वीपणे पार पाडले.
समारोप सोहळ्यात गणेश उईके, कल्याण सोदारी, प्रशांत सारोकर, राजेश मोरपाका आणि प्रणयकुमार बंडी यांची विशेष उपस्थिती होती.
आयोजन समिती :
अध्यक्ष : प्रशांत अटेला
उपाध्यक्ष : रितेश जंगम
सचिव : राकेश आगदारी
सह सचिव: अंगत दुर्गम
कोषाध्यक्ष: तुषार नगराले (किरण)
संयोजक मंडळ :
इमरान कुरेशी, गुड्डू शेख, आशिष जंगम, अविनाश गोमासे, प्रणय कोंडावार, स्वप्निल जंगम, राहुल आगदारी आणि इतर अनेक तरुण सदस्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
ही स्पर्धा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरली असून प्रेक्षकांसाठी ती रोमांच आणि उत्साहाने भरलेली होती. स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे युवकांमध्ये क्रीडा संस्कृती वाढीस लागते आणि सामाजिक ऐक्यालाही चालना मिळते.