ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागरिकांनी श्रमदानाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

नगर परिषदेचा केला निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी गणेश मंदिर परिसरातील नागरिकांनी भद्रावती नगर परिषदेला अनेक अनेकदा निवेदने देऊन या खड्ड्यांच्या तक्रारी केल्या.

मात्र नगर परिषदेने या समस्येकडे कायम दुर्लक्ष केले. शेवटी निराश झालेल्या नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करीत स्वतःच श्रमदान करीत गणेश मंदिर परिसरातील फेरीलँड शाळेजवळील रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला.या रस्त्यावर कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध दोन मोठे खड्डे पडलेले होते. या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अनेक किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले. व अपघाताचे हे सत्र सुरूच होते.

याबाबत नगरपरिषदेला नागरिकांतर्फे निवेदने देऊन खड्डे बुजवण्याची विनंती करण्यात आली मात्र केवळ आश्वासना पलीकडे येथील नागरिकांना काहीच मिळाले नाही. शेवटी सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे व शंकर घोटेकर यांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन श्रमदान करीत हे खड्डे बुजविले व स्वतःच ही गंभीर समस्या मार्गी लावली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये