ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसीलदाराच्या दालनात अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ट्रॅक्टर मालकाचा स्वताच्या अंगावर डिझल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणघाट शहरातील तहसिल कार्यालयात ट्रॅक्टर मालक छोटू दिलीपराव वानखेडे याने वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून ट्रॅक्टर पकडून त्रास देत असल्याचा आरोप करीत चक्क त्याने तहसीलदाराच्या दालनात स्वताच्या अंगावर डिझल ओतून स्वताला जाळून घेण्याचा प्रयत्न केला

    यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याच्या जवळील असलेली आग पेटी घेतल्या मुळे मोठा अनर्थ टळला.

      छोटू दिलीपराव वानखेडे याने तहसीलदाराच्या नावाने लिहलेल्या निवेदनात नमूद केले आहे की माझ्‌यासारख्या बेरोजगार युवकावर सतत अधिकारी अन्याय करत आहे आणि रेतीचा ट्रेक्टर पकडत आहे.

  दूसरेर्‍या ट्रक्टर वाल्याना राजकीय दबामूळे सुट देत असून त्याच्या वरीती कूठली हि कारवाई राजकीय दबावातून करत नसल्याचे म्हणने आहे.

   त्यामूळे हिंगणघाट च्या महसूल प्रशासन वरती कूठल्या राजकीय नेत्याचा दबाव आहे हा सुध्दा प्रश्न समोर आला आहे?

 प्रशासना त्यामूळे मला मला आत्मदहन करायला भाग पाडत आहे.

    मी आधीच व्याजाने पैसे घेऊन कसा तरी ट्रॅक्टर घेतला आणि त्यातून उदरनिर्वाहासाठी हा छोटा व्यवसाय सुरू केला होता

   अशा परिस्थितीत माझे कुटुंब जगणार तरी कस आता हल्ली माझी आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली असून

 या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मी त्रस्त झालो आहे म्हणून मी स्वतःच निर्णय घेतला असून स्वतः आत्मदहन करत आहो करत आहो त्यांनी परीसरात फेकलेल्या निवेदनात म्हंठले आहे.

तरी माझा या आत्मदहनाला शासन/प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये