आमदार भोंगळे यांच्या हस्ते विनामूल्य रेती वाटपाचा शुभारंभ
भोयगांव, सातरी, नलफडी व धाबा यां घाटावरून मिळणार रेती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा : घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आणि घरांचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी (दि. 24) राजुरा विधानसभा क्षेत्रातील भोयगांव, सातरी, नलफडी आणि धाबा येथील रेती घाटांवर आमदार देवराव भोंगळे यांनी लाभार्थ्यांना विनामूल्य रेती वितरणाचा शुभारंभ केला.
लोककल्याणकारी महायुती सरकारच्या या हितावह निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती आता विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्याकरिता राजुरा विधानसभेतील सर्व घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या अधिकृत रेती घाटावरून मिळणाऱ्या विनामूल्य रेती वितरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले आहे.
सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू आहे. स्वतःचे घर म्हणजे स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. घरकुल योजना ही केवळ चार भिंती पुरती मर्यादित नसून, ती कुटुंबाचे भविष्य घडवते. आपल्या महायुती सरकारच्या या निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांचा खर्च कमी होणार असून, गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून, यामुळे घरकुलांच्या बांधकामाला गती मिळेल अशी आशा आमदार भोंगळे यांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, भोयगांव घाटावर तहसीलदार पल्लवी आखरे, संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम, नायब तहसीलदार चिडे, सातरी व नलफडी घाटावर तहसीलदार ओमप्रकाश गोंड, धाबा घाटावर संवर्ग विकास अधिकारी अरुण चनफणे, नायब तहसीलदार चंद्रशेखर वेठे, नायब तहसीलदार नागापुरे, गोंडपिपरीचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार, सुहास माडुरवार, स्वप्नील अनमुलवार, भानेश येग्गेवार, इंद्रपाल धुडसे, निलेश पुलगमकर, आशिष ताजने, भोयगांवच्या सरपंचा शालिनी बोन्डे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, सातरीच्या सरपंचा पद्मा वाघमारे, नलफडीचे सरपंच अमित टेकाम, धाबाच्या सरपंचा नंदा घोगरे, पुरुषोत्तम गावंडे, सुनील खारकर, भाऊराव बोबडे, विजय पारसिवे, यशोधरा निरांजने, भिमराव साळवे, भीमराव पाला, आशिष चांदेकर, राजू निमकर, रवी बोढे, नवनाथ पिंगे, भाऊराव चंदनखेडे, विनोद भोंगळे, मनोहर निमकर, बंडू जुनघरी, राहुल पायघन, संभाजी निखाडे, प्रणय अतकरे, अशोक झाडे, निखील भोंगळे, विजया गेडाम, सचिन भोयर, अभिजित कोंडावार, अनुप मून, निशांत मून, रामचंद्र मंदे, लक्ष्मीकांत मासीरकर, ग्रामसेवक मंजुषा ढोरे, हिराचंद कंदीकुरवार, स्वाती वडपल्लीवार, रवी पावडे, कोमल फरकाडे, संजय येलमुले, अरुणा जांभुळकर, श्री. कोटनाके, रामकृष्ण सांगडे, संजय येलमुले, राजेंद्र गोहणे, विठ्ठल चणकापुरे, अमित कुरंजेकर, गजानन घुगे, निलिमा कंदीकुरवार, अनिसा शेख, नीलकंठ लखमापुरेसह आदींची उपस्थिती होती.