युवा शेतकऱ्यांचे प्रयत्नातून तयार झाली अद्यावत केशर आंब्याची फळबाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
जिल्ह्यातील प्रगतीशील आणि युवा शेतकऱ्यांचा प्रायोगिक शेती करण्याकडे कल वाढत असताना मात्र ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये अनेक शेतकरी आजही पारंपरिक शेतीच शेतकरी करीत आहे. जिल्ह्यात फळबागेसाठी पोषण वातावरण नाही, तरीही ब्रम्हपुरी पासून ३किमी अंतरावर असलेल्या दुधवाही येथील युवा शेतकरी प्रवीण मेश्राम या शेतकऱ्याने २०२१ मध्ये भाऊसाहेब फुंडकर योजनेमार्फत प्रामुख्याने केशर आंब्याची ३०० झाडे, मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, फणस, तायवान पेरू सोबत विविध फळांची लागवड केली आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून, आंब्याच्या विक्रीतून ब्रम्हपुरी तसेच अन्य परिसरातील शेतकरी, आणि ग्राहक पाहण्याकरिता येऊन केशर आंबा प्रति किलो १५० रुपयांनी खरेदी करीत आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामात धान, सोयाबीन या पिकांचेच अधिक क्षेत्र पीक लाळगडीखाली असते. याशिवाय तूर, उडीद, मूग, ज्वारीची लावगड शेतकरी करतात. तसेच रब्बी हंगामात कडधान्य पिकांसह हरभरा, गहू, मका व तेलवर्गीय पिकांची लावगड शेतकरी करीत असतात. ही पिके हंगामी आहेत. जिल्ह्यात फळपीक लावगडीसाठी अद्यापतरी शेतकरी वळले नसल्याचे दिसते.
यापुढे सिंचन क्षेत्र वाढल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबाग लागवट करू शकतात.फळबाग योजनेतून अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये अनुदान मिळाले, शिवाय फळबागेकरीता लागनारे पाणी नियोजन करण्याकरिता ठिंबक सिंचना करिता सुद्धा शासनाकडून अनुदान प्राप्त केले आहे.
युवा शेतकरी प्रविण मेश्राम यांनी शेतात फळबाग सोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय पण सुरू केला आहे अशी माहिती फळबाग शेतकरी प्रविण मेश्राम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.