ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विठुरायाच्या गजरात भाजपाने केले आषाढी एकादशी शोभयात्रेचे स्वागत

जिल्हा महानगर भाजपच्या वतीने वारीतील वैश्वना चहा व नास्ताचे वितरण

चांदा ब्लास्ट

विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या वढा  येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आज माता महाकालीचे दर्शन घेऊन चंद्रपूर येथील वारकरी स्वामी चैतन्य महाराज यांच्या समवेत आपल्या लाडक्या विठूराया चे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असून त्यांचा सोईसाठी व एकादशीचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा महानगर भाजपच्या वतीने वारीतील वैश्वना चहा व नास्ताचे वितरण करण्यात आले व  गिरनार चौक येथे वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि वारीत सामील होऊन भाजपा पदाधिकाऱ्यानी फुगडी रींगन खेळून श्री चैतन्य महाराज यांना ओक्षवंत करून पुढच्या प्रवासासाठी अभिवादन केले.

 याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने सांस्कृतिक मंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज भैया अहिर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा महानगर भाजप चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महानगर मंत्री सुभाष कसंगोट्टूवार, रवी गुरनुले, ग्रामीण महामंत्री नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवर, रवी लोणकर, दिनकर सोमलकर,महिला मोर्चा मंत्री शिलाताई चव्हाण आदिसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाविक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये