ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बूथ मजबूत झाला तरच पक्ष सशक्त होईल

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.गुलवाडे यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.पक्षातील कार्यकर्ता हीच पक्षाची शक्ती आहे.पक्षाला आणखी सशक्त करायचे असेल तर बूथ मजबूत असणे आवश्यक आहे.कार्यकर्त्यांनी या विषयाला गांभीर्याने घेऊन कार्य केल्यास प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकता येईल,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.
ते मोदी@09 महाजनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मेरा बूथ सबसे मजबूत व्हर्चूअल कार्यक्रमाचा समारोप करतांना बोलत होते.विशेष म्हणजे 27 जून 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.त्याच वेळी सकाळी 10 वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे थेट प्रसारण करण्यात आले.लोकनेते ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमात
डॉ. स्वप्नील बी. मंत्री प्रदेश समन्वयक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश, डॉ. विष्णू बावणे आयुर्वेद विंग प्रदेश सहसंयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश,डॉ किरण देशपांडे वैद्यकीय आघाडी अध्यक्ष,रवींद्र गुरनुले भाजपा महामंत्री,डॉ.यशोधन वाडेकर,छबूताई वैरागडे, डॉ. भारती दुधानी,किरण बुटले,पूनम गरडवा,मनोज सिंघवी,सूर्यकांत कुचनवार,धनराज कोवे रवी लोणकर,विनोद शेरकी,शितल आत्राम,प्रमोद शाश्त्रकार दिवाकर पुद्दटवार,अरुण रहांगडाले ,राजू जोशी,बंडू गौरकार,अरविंद मडावी,आनंदराव मांडाळे,जयश्री आत्राम  यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये