ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नदी पात्रातून अवैध रेतीची वाहतूक

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 02.05.205 रोजी मा. पोलीस अधीक्षक सा, व मा. अप्पर पोलीस अधीक्षक सा. यांचे मार्गदर्शनात, सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल ल. चव्हाण, साहेब पुलगांव यांचे पथकातील पोउपनि सुधिर बनकर सोबत सफौ/1116 दिपक जाधव, पोशि/635 संदीप बोरबन, पोशि/180 उमेश बेले व पोशि/1464 रामदास दराडे यांनी पोलीस स्टेशन अल्लीपुर हद्दीतील आरोपी हे संगनमत करून अवैद्यरित्या वर्धा नदी पात्रातील कापसी घाटातुन रेती चोरून वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने नमुद आरोपीतांनावर नमुद घटना ता. वेळी व स्थळी छापा टाकुन 03 ट्रॅक्टर चालक व मालका यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून दोन पंचासमक्ष ट्रॅक्टर व ट्रॉलीसह 18,10,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सविस्तर असे की, नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील नमुद आरोपीतांवर गुप्त बातमीदार कडुन मिळालेल्या माहीती वरून रेड केला असता आरोपी 1. संजयराव गेडाम, रा. सावंगी पेरका, ता. राळेगांव जि. यवतमाळ, 2. महेंद्र नैताम, रा. सावंगी पेरका, ता. राळेगांव जि. यवतमाळ, 3. अविनाश उत्तम कोवे, रा. पिंपळखुटी, ता. राळेगांव जि. यवतमाळ, 4. प्रफुल नारनवरे, रा. राळेगांव ता. राळेगांव जि. यवतमाळ, 5. किशोर मारोती तांगडे, रा. राळेगांव ता. राळेगांव जि. यवतमाळ 60 राजु देवकर, रा. राळेगांव ता. राळेगांव जि. यवतमाळहे संगनमताने आपले ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॅाली ने अवैधरित्या रेती चोरून वाहतुक करीत असतांना वर्धा नदीच्या पात्रातील कापसी रेती घाटात 03 ट्रॅक्टर वाहतुक करतांना मिळुन आल्याने ट्रॅक्टर चालक व मालका विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून दोन पंचासमक्ष घटनास्थळ  जप्तीपंचनामा कार्यवाही प्रमाणे 1.एक विना क्रमांकाचा निळया रंगाचा सोनालीका कंपनी चा डी.आय. 745 अंदाजे किंमत 5,00,000/- रू. व एक लाल रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 1,00,000/- रू.

2.एक विना क्रमांकचा हिरव्या रंगाचा जॉन्डेर कंपनीचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत 5,00,000/- रू. व एक लाल रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 1,00,000/- रू

3.एक विना क्रमांकाचा निळया रंगाचा सोनालीका कंपनी चा डी.आय. 745 अंदाजे किंमत 5,00,000/- रू. व एक लाल रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 1,00,000/- रू 4.रेती किंमत 10,000/- रू जुमला किंमत 18,10,000/- रू चा मुद्येमाल मिळुन आल्याने एकुण जुमला किंमत 18,10,000/- रू चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये