ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत श्री संताजी युवक मंडळाची कार्यकारणी गठित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर – संत श्री संताजी सेवा मंडळ बल्लारपूर या संचालक मंडळाच्या वतीने संत श्री. संताजी सेवा मंडळाची युवक कार्यकारणी बुधवार दि.१५ मे रोजी गठित करण्यात आली आहे. या युवक कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून मोहित माहादेव ईटनकर तर सचिव पदी मोनीश रवींद्र हजारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवकांच्या मदतीने संत श्री संताजी सेवा मंडळाचे काम गतिशील आणि लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या कार्यकारणी मंडळात एकूण ३१ युवकांची विविध पदाची जवाबदारी संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

          संत श्री संताजी सेवा मंडळ बल्लारपूर यांची संचालक मंडळाची निवडणूक अलीकडच्या काळात संपन्न झाली होती. यानंतर युवकांच्या मदतीने मंडळाचे काम अधिक गतीशिल आणि लोकाभिमुख व्हावे, याकरिता संत श्री संताजी सेवा मंडळ बल्लारपूर संचालक मंडळाच्या वतीने युवक मंडळाची कार्यकारणी बुधवार दि.१५ मे रोजी गठित करण्यात आली. या युवक कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून मोहित महादेव ईटनकर तर सचिव पदी मोनीश रवींद्र हजारे, उपाध्यक्ष म्हणून अभय शेंडे, मंगेश टिकले, सहसचिव विक्रांत येनुरकर, पलाश कवलकर, कोषाध्यक्ष म्हणून लोमेश वैरागडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. यामध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून दिपक सातपुते, प्रदिप लोखंडे, राजू बुरांडे, हर्षल जुवारे, उमेश कुंडले, प्रणय सातपुते, बुटले, राहुल कळंबे, मोनीष खनके,हितेश मोगरे, निखिल घुबडे, अवि नरड, मोहित आदमाने, निखिल नरडे, हितेश मोगरे, श्रीकांत ईटनकर, सार्थक शेंडे, मयूर रागीट, हरिदास आंबटकर,अनिकेत बेलखोडे, प्रशील मोगरे, विकास शेंडे, मनोज बेले, अजय मंगरूळकर, प्रज्योत ईटनकर यांचा सहभाग आहे. सर्व युवकांचे संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

लवकरच संत. श्री संताजी सेवा मंडळाची युवती कार्यकारणी आणि महिला मंडळ कार्यकारणी जाहीर होणार असल्याची माहिती संत श्री. संताजी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. मंगेश बेले यांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये