ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृती शिक्षिका अनमूलवार मॅडम आणि ८वी च्या विद्यार्थ्यांना निरोप आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळा (सेमी इंग्रजी) बोंड येथील शिक्षिका मंगला अनमुलवार मॅडम यांना सेवानिवृत्त व आठवीच्या विद्यार्थ्यांनी निरोप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला शाळेचे समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक एकवणकर,, सत्कार मूर्ती मंगला अनमुलवार, सुरेश अनामुलवार , ऍड आनंद घुटके, अजितकुमार बनकर, जगदीश राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी दीप प्रज्वलित करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.

कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती व सेवानिवृत्त शिक्षिका मंगला अनमुलवार व त्यांचे पती सुरेश अनामुलवार यांचा शाल, श्रीफळ मानचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी दिलेली सेवा आणि मुलानी कार्यक्रमात केलेली पुष्प वर्षावाने पेढा भरवून आशीर्वाद घेतला यावेळी सर्वांच्या डोळ्यातून भावनाशील दिसून शाळेप्रती भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेतले आहेत त्यांना मिळालेले प्रमाणपत्र आणि त्यांना मिळालेली शालेय शिष्यवृत्ती धनादेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अजित कुमार बनकर पोलिस उप निरीक्षक यांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करून जिद्द व चिकाटी आणि श्रम करणे आवश्यक आहे ऍड आनंद घुटके यांनी देशात कायद्याचे सर्वांनी पालन करण्यासाठी उच्च शिक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जगदीश राऊत यांनी विद्यार्थाचे गुणगौरव करून पुढील शिक्षण हे घेताना आपला उद्देश व ध्येय ठरवून करावा असे सांगितले कार्यक्रमाचे संचालन कुंनिशा मेश्राम हिने केले तर आभार सीमा भुसारी हिने केले यावेळी शाळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि शिक्षक, विद्यार्थी आणि निरोप घेणारे आठवीचे विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये