नागभीड तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीची सोडत
२३एप्रिल रोजी तहसील कार्यालयात आरक्षण पद्धतीने काढण्यात आली आहे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड तालुक्यात ५६ग्रामपंचायती असून त्यापैकी अनु जाती ७, अनु जमाती ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग १० आणि खुला प्रवर्ग ११ महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
नागभीड तालुका कार्यालयात आज तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी जनगणना यांचा आणि आज पर्यंत जे आरक्षण झाले नाही आणि जातीची टक्केवारी यांचा लेखाजोगा नागरिकांना वाचन करून सांगण्यात आले.
नागभीड तालुक्यात अनु जाती, अनु जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग अशी वर्गवारी जाहीर करण्यात आली यावेळी अनु जाती ७, अनु जमाती ८, ना मागास प्रवर्ग महिला १०, आणि खुला प्रवर्ग महिला ११अशी सोडत ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आले. तालुक्यात ५६ग्रामपंचायती असून ३६ ग्रामपंचायतीवर महिला राज्य असणार असून २०ग्रामपंचायतर पुरुष राज राहणार असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी महिला सरपंच होत्या त्या ठिकाणी चक्राकार पद्धतीने आरक्षण काढण्यात आले असून जनगणना आणि १९९५पासून सरपंच यांचा आधार घेत आरक्षण काढण्यात आले यावेळी तहसीलदार प्रताप वाघमारे, उमेश काळे नायब तहसीलदार, निवडणूक अधिकारी, आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागभीड येथील ५६ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.