ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामगार नेते साईनाथ बुचे यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आवारपुर येथील एल अँड टी सिमेंट कामगार संघटनेने महासचिव जेष्ठ कामगार नेते साईनाथ बूचे (६४) यांचे सोमवारी सकाळी १०.१५ वाजता नागपुर येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले,१९ मार्च रोजी सकाळी साईनाथ बुचें मार्निग वॉक करत असताना अज्ञात दुचाकी स्वाराने जबर धडक देऊन गंभीर जखमी केले होते, अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता, प्रथम चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नागपुर येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले,उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे, साईनाथ बूचें हे गेल्या तीन दशकांपासून कामगारांच्या हक्कासाठी लढा देत होते, अनेक आंदोलने करून कामगारांना न्याय मिळवून दिला कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांचे ते कट्टर समर्थक होते.

त्यांच्या मूळ गावी बिबी येथे आज मंगळवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेते राहुल पुगलिया, ॲड अरूण धोटे, ॲड सदानंद लांडे, अल्ट्राटेक सिमेंट चे युनिट हेड, इतर अधिकारी कर्मचारी,कामगार, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये