ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिग्रस बु येथे गोठ्याला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील डिग्रस बू येथील शेतकरी पंढरीनाथ पुरुषोत्तम हरणे यांच्या गोठ्याला 10 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता एम एस ई बी च्या ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले 50 पोते, सोयाबीन, पी वी सी पाइप, स्प्रिंकलर सेट, स्प्रे पंप, चारा,भुसा, जळून खाक झाला,3 वर्षाचे वगार आगीत जळून मृत्यू पावले असे एकूण 5 लाख,67 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचासमक्ष पंचनामा केला आहे, शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये