माता महाकाली जत्रेत भाजपाचे मदत केंद्र
लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट
भाविकांसाठी बिस्कीट व पाणीचे वितरण
महानगर भाजपाचा उपक्रम
चंद्रपूर :- चंद्रपूरची आराध्य दैवत श्री माता महाकालीची जत्रा नुकतीच सुरू झाली आहे.चैत्र नवरात्रीच्या या पावन पर्वात दिवसेंदिवस जत्रेतील भाविकांची वाढणारी गर्दी वाढत आहे.याची दखल घेत महानगर भारतीय जनता पार्टी तर्फे मंदिर परिसरात भाविकांसाठी मदत केंद्र उभारण्यात या मदत केंद्रात भक्त करूनच्या येणाऱ्या समस्याच्या निरंकरण येते तसेच मंदिर परिसरातील दुकानदारांना समस्या सोडवण्यासाठी व भक्त करून च्या एखादी नातेवाईक सदर जत्रे परिसरामध्ये हरवला असल्यास त्याची सुद्धा दखल भाजप मदत केंद्रामध्ये घेण्यात येत आहे.या सोबतच भाविकांना बिस्कीट व थंड पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी वने,मत्स्यपालन व्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून हा उपक्रम महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात भाजप मदत केंद्रात मदत देण्यात येत आहे. यावेळी मदत करते
संदीप आगलावे,अजय सरकार, रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, राजेश यादव,राजेंद्र खांडेकर, विठ्ठल डुकरे, चंद्रकला, चंदन पाल, राजेंद्र दागमवार,आकाश ठोसे,बंडू गौरकार, आकाश मस्के, हेमंत बोमीटवार, रेखा दातारकर,(चेने) शालू ताई कनोजवार, सिंधुताई राजगुरू, कांताताई कोहपरे, मीनाताई पारमपल्लीवार, अर्चनाताई उरकुडे, संगीता बावणे, धुमदेव मरसकोल्हे, रवींद्र काळे, दशरथ, सोनकुसरे, रंजनाताई उमाटे, कुणाल गुंडावार, शाम दितारकर, अरुण झट्टे, अनिल शेंडे, श्याम चक्रदेव, विजू राऊत, शांताराम भोयर, पराग मलोडे,,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जत्रा संपेपर्यंत सुरू राहील केंद्र
चैत्र नवरात्रीमध्ये विशेषतः नांदेड व दक्षिण भारतीय भक्तांची मांदियाळी असते.रखरखत्या उन्हाची पर्वा न करता लोकं येतात.त्यांची सोय व्हावी म्हणून आम्ही सेवेत आहो.हे केंद्र जत्रा संपेपर्यंत सुरू राहणार आहे.भाविकांना बिस्कीट व थंड पाणी देखील देण्यात येत आहे.
राहुल पावडे
जिल्हाध्यक्ष, महानगर भाजपा, चंद्रपूर.