Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्त्याच्या मधून गेलेली विद्युन लाईन धोकादायक

विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील चंदनखेडा रस्त्यावरील मासळ येथे ११के.व्ही. ची विद्युत लाईन रस्त्याच्या मधून गेल्याने ती काही दिवसापासून लोमकळत आहे त्यामुळे मोठे वाहन आल्याने विद्युत लाईनचा स्पर्शाने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या जीवघेण्या विद्युत तारा त्वरीत हटवण्याची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे यांनी विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. पिरली फाटा ते मासळ रस्त्यावर विनोद काकडे यांचे शेत आहे या शेतात जवळून जाणाऱ्या रस्त्यावर या विद्युत तारा गेल्या कित्येक दिवसापासून लोमकडत आहे कधी कधी तारा ह्या ट्रक व बस यासारख्या वाहनाला स्पर्श होताना दिसतात त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवित आणि होऊ शकते याकरिता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत काळे यांनी याबाबत विद्युत वितरण कंपनीला तक्रार केली मात्र या प्रकाराकडे विद्युत वितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये