ताज्या घडामोडी
शिवसेनेची राजुरा तालुका सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
राजुरा येथे शिवसेना (शिंदे गट) सदस्य नोंदणी आढावा बैठक 3 एप्रिल रोजी शहरातील मच्छीमार सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली. ह्यावेळी जवळपास 50 नविन सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून शिवसेनेत प्रवेश केला.
ह्या आढावा बैठकीसाठी जिल्हाप्रमुख बंडू हजारे, उपजिल्हाप्रमुख नितिन धानोरकर, तालुका प्रमुख मोहन सूर्यवंशी ह्यांचेसह जिल्हा कार्यकारिणी तसेच राजुरा तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.