ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहा वर्षीय मेराज खान जहीर खान व मु्जम्मील खान जफर खान यांचा पहिला रोजा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा येथील जय शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष जहीर खान यांचा मुलगा मेराज खान जहीर खान व त्यांचा पुतण्या मुजम्मील खान जफर खान याने आपल्या वयाच्या दहाव्या वर्षी पहिला रोजा पूर्ण केला. प्रत्येक धर्मात उपवासाला महत्त्व असून उपवास असो की रोजा ह्या धार्मिक विधी द्वारे भाविक आत्मशांती प्राप्त करतात धगधगत्या उन्हाळ्यात वयाच्या जेमतेम दहाव्या वर्षी मेराज व मुजम्मील ह्या दोन चिमुकल्याने 14 तास अन्नाचा एक घास न खाता तसेच पाणी न पिता उपाशी राहून अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त केली आहे कमी वयात आपल्या जीवनातील पहिला रोजा ठेवणाऱ्या मेराज व मुजम्मिल या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये