ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरा येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी भद्रावती पोलिसांकडून एका आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती तालुक्यातील चोरा येथील शेत शिवारातील विहिरीत मृत आढळलेल्या अल्पवयीन मुली प्रकरणी भद्रावती पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. अक्षय दोडके, वय 22 वर्षे, राहणार चोरा असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत आत्महत्येस परावृत्त करणे यासह अन्य संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर अल्पवयीन मुलगी ही दिनांक 21 ला पहाटेच्या सुमारास शिवारातील एका विहिरीत मृत अवस्थेत आढळून आली होती.

मुलीच्या आईने आपल्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये