वणा नदीच्या डंकीन रेती घाटातून अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक
एकूण 22 लाख 61 हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 21/03/2025 रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. हिंगणघाट हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवित असताना गोपनीय माहितीच्या आधारे पो स्टे हिंगणघाट हद्दीत वना नदीतून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असते अश्या माहिती वरून सदर ठिकाणी पथकांनी रात्रभर दबा धरून बसुन छापा टाकला असता 1) ट्रॅक्टर मालक चालक – छोटू दिलीपराव वानखडे, वय 32 वर्ष, रा. माता मंदीर वार्ड, ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा.
2) ट्रॅक्टर चालक धिरज गजानन साळवे, वय 20 वर्ष, रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट जि. वर्धा.3) ट्रॅक्टर मालक नितेश नवरखडे रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट, वर्धा (पसार)4) ट्रॅक्टर चालक मालक महादेव गणपतराव भोयर वय 58 वर्ष, रा. नन्नाशा वार्ड, हिंगणघाट, वर्धा. हे संगनमताने डकिंग रेती घाटातून अवैधरित्या रेती उत्खनन करून चोरी करतांना रंगेहाथ मिळून आले त्यांचे ताब्यातून *जप्त माल वर्णन :-* (1) 1) एक जुना वापरता हिरव्या रंगाचा जान डीर कंपनीचा दोन्ही बाजूंनी क्रमांक नसून कि. 6,00,000 रू 2) एक ट्रॅक्टरला लागून असलेली ट्रॉली किं. 1,50,000 रू. 3) ट्रालीमध्ये अंदाजे 80 फुट रेती किं 4,000 रू (2) 1) एक जुना वापरता लाल रंगाचा महिंद्रा सरपंच कंपनीचा ट्रॅक्टर क्र. Mh 27 बी बी 1435, कि. 6,00,000 रू (2) एक जुनी वापरती विना क्रमांकाची ट्राली कि. 1,50,000 रू. 3) ट्रालीमध्ये अंदाजे 80 फुट रेती कि 4,000 रू.(3) 1) एक जुना वापरता लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर विना नंबरचा कि. 6,00,000 रू (2) एक लाल रंगाची विना क्रमांकाची ट्राली कि. 1,50,000 रू.3) ट्रालीमध्ये अंदाजे 60 फुट रेती किं 3,000 रू असा *एकुण जु.कि. 22,61,000/- रू. चा* मुद्देमाल हस्तगत केला. तिन्ही ट्रॅक्टर चालक- मालक आरोपीस सदरची रेती बाबत रॉयल्टी किवा परवाना आहे का? व रेती कुठून भरली? याबाबत विचारणा केली असता त्यांनी रेतीची रॉयल्टी नसुन हिंगणघाट वणा नदीचे डंकीन घाटातून काळी ओली रेती काढून सदरची रेती त्यांचे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरली आहे, असे सांगितले. सदर ट्रॅक्टर चालक मालक आरोपी विरुध्द पो स्टे हिंगणघाट येथे कलम 303(2),3(5) भारतीय न्याय संहिता 2023 कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, पो.अ. अमोल नगराळे, गोपाल बावनकर, दीपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.