Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही

रेतीची वाहतूक करणारा ट्रक चालक/मालक, 2 टिप्पर व रेतीसह एकुण 30 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

             दि. 26/11/24 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथक पो.स्टे. सेवाग्राम परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, 2 टिप्पर 1) लाल हिरव्या रंगाच्या टिप्पर क्र. MH-13-AU-7860 चा चालक/मालक व 2) पिवळ्या रंगाचा टिप्पर क्र. MH-32-Q-6462 चा चालक यांनी संगणमत करून मौजा तरोडा जिल्हा वर्धा येथील घाटातून काळी ओलि रेती शासनाची कोणताही पास परवाना (रॉयल्टी) नसतांना घेऊन येत आहे.

अशा माहितीवरून मदनी पावर स्टेशन परिसरात नाकाबंदी करून रेड केला असता 2 टिप्पर 1) लाल हिरव्या रंगाच्या टिप्पर क्र. MH-13-AU-7860 चा चालक नामे – भारत भीमराव अंबाडारे, वय 32 वर्ष, राहणार वार्ड क्रमांक 5 साठोडा, 2) पिवळ्या रंगाचा टिप्पर क्र. MH-32-Q-6462 चा चालक – विनोद अरूणराव डवरे, वय 45 वर्ष, राहणार वार्ड क्र. 5 पिंपरी मेघे जि. वर्धा यांनी शासनाचा कोणताही पास परवाना (रॉयल्टी) नसतांना ओल्या काळ्या रंगाची रेती वाहतूक करतांना मिळून आले आरोपी क्र. 1 व 2 यांचे ताब्यातुन 2 टिप्पर कि. 30,00,000/- रु, व 07 ब्रास काळी ओली (700 फूट) रेती किंमत 70,000/-रु. जु किं. 30,70,000/- रू चा मुद्देमाल जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुन नमूद आरोपीं विरुद्ध पो. स्टे. सेवाग्राम अप. क्र. 897/24 कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

          सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसूते, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे,भूषण निघोट, मनीष कांबळे, रितेश शर्मा, अमोल नगराळे, गोपाल बावनकर दीपक साठे, मंगेश आदे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये