गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपूर पोलीसांकडून गणेशपूर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम

एकूण ४ लाख ३५ हजारावर मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 आज दि. 01/08/2023 रोजी आम्ही स.पो.नी एस.बी. शेगांवकर सोबत स.फौ./377 विक्की मस्के पो.हवा./261 अरविंद येनुरकर, पो.हवा./177 दिपक वानखेडे, पो.हवा./315 मनोज कोसुरकर, पो.हवा./1188 विनायक खेकडे, पो.ना./1245 रवि पुरोहित, पो.ना./299 राजेश शेंडे, पो.ना./139 हेमंत नरड, पो.शि./1626 वैभव चरडे, पो.शि./374 आशिष कांबळे, चा.पो.शि./191 रोशन उईके यांनी मौजा गणेशपूर पारधी बेडा येथे वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या जंगल शिवारात झुडपात लपवून ठेवलेले व जमिनीत गाढून असलेले 73 लोखंडी व प्लास्टीक ड्रम तसेच 26 मोठ्या पाॅलिथिन पिशव्यांमध्ये एकुण 7,300 ली कच्चा मोहा सडवा रसायण ड्रमसह किं. 3,93,400 रू. व 14 प्लास्टीक कॅनपैकी 08 प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 240 ली मोहा दारू कॅनसह किं. 26,800 रू., 06 पोत्यांमध्ये अंदाजे 200 किलो गुळ किं. 8,000 रू., 7 जर्मन घमेले किं. 7,000 रू असा जु.किं. 4,35,200 रू. चा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल मिळून आला असून, सदरचा मुद्देमाल आरोपी नामे 1) उमेश रविंद्र फुलमाळी, वय 36 वर्ष, 2) आबीत रविंद्र फुलमाळी, वय 38 वर्ष, 3) रूशिबाल ठमाई राउत, वय 35 वर्ष, सर्व रा. गणेशपूर पारधी बेडा, तह. समुद्रपूर यांचे मालकिचा असल्याचे निष्पन्न झाल्याने, पंचासमक्ष मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून जागीच नाश करण्यात आला. सर्व आरोपीतांवर कलम 65 (ई,एफ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली. .करीता सदरचा अहवाल माहितीस्तव सविनय सेवेशी सादर आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डाॅ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा. श्री. एस.बी. शेगांवकर सा. यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, दिपक वानखेडे, मनोज कोसुरकर, विनायक खेकडे, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, हेमंत नरड, पो.शि. वैभव चरडे, आशिष कांबळे, चा.पो.शि.रोशन उईके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये