ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वयंसिद्धा साडी वॉकथॉन २०२५ –मध्ये जयश्री संजय सोनुने प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 स्वयंसिद्धा साडी वॉकथॉन २०२५ ही केवळ एक स्पर्धा नसून, महिलांच्या सशक्तीकरणाचा, आरोग्यप्रेमाचा आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान करणारा एक आगळावेगळा सोहळा आहे.

महिलांचे आरोग्य, फिटनेस आणि आत्मविश्वास वाढवावा, यासाठी स्वयंसिद्धा महिला मंच सिंदखेड़ राजा हे नेहमीच कार्यरत असते त्या अनुषंगाने हा अनोखा उपक्रम आयोजित केला. पारंपरिक साडी नेसून, आधुनिक युगातील महिलाही तितक्याच सक्षम आणि ऊर्जावान आहेत, हे अधोरेखित करण्यासाठी हा ३ किलोमिटर चा वॉकथॉन आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून तीन गोष्टी साध्य करायच्या होत्या:

महिला सशक्तीकरण: साडी हा केवळ पारंपरिक पोशाख नाही, तर तो स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे.

आरोग्य आणि फिटनेस: चालण्यासारखा सोपा व्यायाम महिलांनी आपल्या दिनचर्येत आणावा, हा आमचा हेतू.

सामाजिक एकजूट: विविध क्षेत्रांतील आणि वयोगटांतील महिलांना एकत्र आणून, सौहार्द आणि बंधुता निर्माण करणे.

 या भव्य कार्यक्रमात ७०पेक्षा जास्त महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री सोनुने, द्वितीय क्रमांक अश्विनी ठाकरे तर तृतीय क्रमांक आशा चौधरी यांनी पटकाविला.सर्व स्पर्धकांनी आत्मविश्वासाने आणि आनंदाने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खूप छान प्रतिसाद दिला.स्पर्धे नंतर सर्व स्पर्धकाना दूध व केळी वाटन्यात आली.

कार्यक्रमात 3 प्रथम आलेल्या स्पर्धकाना रू.२५००/-,रू १५००,रू. १०००/- रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देण्यात आले तसेच सर्व सहभागी महिला स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक देण्यात आले

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंसिद्धा महिला मंचच्या सविताताई गानार,कविता मिनासे,सोनाली खरात,शुभांगी मगर,अरुणा चौधरी,प्रतिभा तायड़े,सारिका मेहेत्रे,डॉ.रजनी म्हस्के,डॉ. मंजुश्री खुरपे,डॉ.सौ.किरण म्हस्के यांनी मेहनत घेतली

स्वयंसिद्धा साडी वॉकथॉन हा फक्त एक दिवसाचा उपक्रम नसून, महिलांच्या फिटनेस आणि आत्मसन्मानाचा प्रवास आहे. हा उपक्रम भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात पुढे न्यावा, यासाठी स्वयंसिद्धा महिला मंच सिंदखेड़ राजा हे ७वर्षांपासून कार्यरत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये