महिला दिनाचे निमित्त कवी संमेलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डी. डी. कॉन्व्हेंट अकोला (मलकापूर )येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यनिमित्ताने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिलाताई गहलोत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नयना पो्हेकर, मंगला बंड, देविकाताई देशमुख, ज्योती कुलकर्णी, प्रतिभा पाथ्रीकर, प्रज्ञा कुलकर्णी, लता थोरात, अमिता घाटोळ, प्रांजल रायपुरे, डॉ. रुपाली साळवे, उपस्थित होत्या. क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांचे प्रतिमेला माल्यर्पण करून व दीप प्रज्वलीत करून कार्यक्रम सुरु झाला. महिलांनी सावित्री बाई फुले यांचे जीवनावर प्रकाश टाकला.
कविसंमेलनात अनेकांनी आपल्या सुंदर कविता सादर केल्या, संचालन शुभांगी पोकळे व लता थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन तीक्ष्णमला तायडे यांनी केले, कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.