ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्यापणे काम चालणाऱ्या दुकानात पोलिसांचा छापा

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 26/05/2025 रोजी पो.स्टे. दहेगाव (गो) येथील पोलीसांना खबर मिळाली की, मौजा हमदापुर बसस्टॉफ येथे अर्सालन उर्फ सोनु शहा रा. सिंदी रेल्वे व त्याचा मित्र नागे शंकर अगनेरकर रा. हमदापुर असे दोघे मिळुन संगणमत करून हमदापुर गावात राहणारा विक्की विचोरे याचे मालकिचे ब्लॉक (दुकाणामध्ये) शंकर ऑनलाईन लॉटरी सेंटरचे नावावर स्वताचे आर्थीक फायदयाकरीता जुगार अंड्डा चालवित असुन त्याच ठिकाणी अवैधरित्या देशी विदेशी दारूचा सुध्दा व्यवसाय चालवित आहेत. अशी माहीती प्राप्त झाल्याने सदर माहीतीचे आधारावर मौजा हमदापुर बसस्टॉफ समोरील शंकर ऑनलाईन लॉटरी सेंटर चे दुकाणात जावुन छापा टाकला असता.,

आरोपी नामे 1) अर्सालन उर्फ सोनु अश्नुर शहा, वय 22 वर्ष रा. वार्ड नं. 2 राजेंद्र नगर सिंदी (रेल्वे), ता. सेलु, जि. वर्धा, 2) शंकर गेंदलाल अमनेरकर, वय 34 वर्ष, रा. वार्ड नं 3. हमदापुर, ता. सेलु, जि. वर्धा (जुगार व दारूचा व्यवसाय चालविणारे नौकर) हे संगणमताने दोन वेगवेगळ्या संगणकावर जुगाराचा खेळ चालवित असतांणा रंगेहात मिळुन आले. त्यापैकी एका संगणकावर राजश्री नावाचा जुगार खेळ व दुसऱ्या संगणकावर गोल्डन चॉन्स नावाचा जुगार खेळ चालवितांणा मिळुन आले. सदर ठिकाणाची आणखी झडती घेतली असता त्या ठिकाणी देशी व विदेशी दारूचा माल सुध्दा मिळुन आला दोन्ही आरोपीचे ताब्यातुन 1) 02 नग डेल कंपनिचे मॉनिटर (संगणक) काळ्या रंगाचे प्रति नग किंमत 20,000 रू. प्रमाणे एकुण 40,000रू 2) 02 नग एच.पी. कंपनिचे सिपीयु काळया रंगाचे प्रति नग किंमत 15000रू प्रमाणे एकुण 30,000रू 3) 02 नग अॅपसोन कंपनिचे प्रींटर कागदी रॉलसह प्रति प्रींटर किंमत 2500 रू प्रमाणे एकुण 5000 रू 4) 02 नग डेल कंपनिचे कि बोर्ड प्रति नग किंमत 500 रू प्रमाणे एकुण 1000रू 5) 02 नग फॉक्सीन कंपनिचे माउस प्रति नग किंमत 250रू प्रमाणे एकुण 500रू 6) 01 नग डोंगल जिओ कंपनिचे काळया रंगाचा (इन्टरनेट वापराकरीता) केबल सह किंमत 2500 रू 7) 02 नग हॅनीवेल कंपनिचे स्कॅनर प्रति नग 1000रू प्रमाणे एकुण 2000 रू 8) 04 नग प्रींटर रॉल प्रति नग किंमत 50 रू प्रमाणे एकुण 200रू 9) जुगाराचे व दारूविक्रीचे नगदी 1560रु आरोपी क्र. 01 यांचे ताब्यातुन 10) 01 नग केसरी रंगाचा लोखंडी कुलर प्लास्टीक टफसह किंगत 4000 रू 11) 03 नग ग्रे रंगाचे व 02 नग केसरी रंगाचे असे एकुण 05 नग प्लास्टीकचे स्टुल प्रति नग किंमत 300रू प्रमाणे एकुण 1500 रू 12) 02 नग पिवळसर रंगाच्या प्लास्टीक खुर्ध्या प्रति नग 300रू प्रमाणे एकूण 600रु 13) 180 एम.एल. च्या देशी दारूने भरून असलेल्या लावणी कंपनिच्या 06 काचेच्या शिश्या प्रति नग 150रू प्रमाणे एकुण 900रू 14) 180 एम.एल. च्या विदेशी दारूच्या रॉयल स्टॅग कंपनिच्या 06 काचेच्या शिश्या प्रति नग 400रू प्रमाणे एकुण 2400रू असा एकुण जुमला किंमत 92,160 रू चा माल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून संपुर्ण कार्यवाही माल जप्त करून आरोपी नामे 1) अर्सालन उर्फ सोनु अश्नुर शहा, वय 22 वर्ष रा. वार्ड नं. 2 राजेंद्र नगर सिंदी (रेल्वे), ता. सेलु, जि. वर्धा, 2) शंकर गेंदलाल अमनेरकर, वय 34 वर्ष, रा. वार्ड नं 3, हमदापुर, ता. सेलु, जि. वर्धा, (जुगार व दारूचा व्यवसाय चालविणारे नौकर ) ३) प्रफुल मेश्राम रा. हिंगणघाट मो.नं. 9960454753 (मुळमालक) मिळुन आला नाही. 4) विवकी नारायण विचोरे, रा. वार्ड नं 2 हमदापुर ता. सेलू, जि. वर्धा, (जुगार व दारूचा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा) यांचे विरुद्ध अपराध क्र. 104/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा राहकलम 65 ई. 773, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 49 भारतिय न्याय संहिता – 2023 प्रमाणे एकुण 04 आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सा, गा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रगोद मकेश्वर सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे आम्ही पोलीस निरिक्षक यशवंत कदम ठाणेदार पो.स्टे दहेगाव गो. राह पोलीस हवालदार आनंद भस्मे, ब्रम्हानंद मुन, गजानन बाट, पोलीस अंगलदार अनिल चिलगर, रूरतम मुंगल, भारत सातपुते सर्व नेमणुक पो.स्टे. दहेगाव गोसावी यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये