ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री महर्षी विद्यामंदिर येथे मकर संक्रांती व आजी-आजोबा दिवस साजरा

चांदा ब्लास्ट

श्री महर्षी विद्यामंदिर चंद्रपूर येथे मकर संक्रांती व आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वर्ग नर्सरी ते के .जी.2 पर्यंतचा विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या आजी -आजोबांचा सहभाग होता.

या कार्यक्रमाप्रसंगी श्री गुरुकुल शिक्षा संस्थेच्या उपाध्यक्ष वसुधा कंचर्लावार मॅडम सचिव श्री दत्तात्रय कंचर्लावार सर उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी सर्व आजी-आजोबांना व विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात वर्ग नर्सरीच्या विद्यार्थ्यांची लूट करण्यात आली तसेच त्यांच्या आजी-आजोबांतर्फे मोठ्या आनंदाने या चिमुकल्यांना लुटण्यात आले. के जी .1च्या विद्यार्थ्यांनी आलेल्या आजी आजोबांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले तसेच वर्ग के .जी .2 च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजी -आजोबांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आकर्षक असे नृत्य सादर केले. या कार्यक्रमात सर्व आजी-आजोबांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळां चे आयोजन करण्यात आले होते व आजी-आजोबांनी मोठ्या उत्साहात या खेळात भाग घेतला व त्यांच्या बालपणीच्या आठवणी जागा झाल्या.

नात्याच्या एकत्रीकरणासाठी शाळेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्वांना “तिळगुळ घ्या व गोड गोड बोला “म्हणून तिळगुळ व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पतंगी देण्यात आल्या . खेळातील विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास सहभागी सर्वांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मी मूर्ती मॅडम व उपमुख्याध्यापिका निशा मेहता मॅडम यांनी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.सर्व चिमुकल्यांनी तसेच सर्वांच्या आजी-आजोबांनी उंच पतंग उडवून या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमात गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री गिरीशजी चांडक सर, सचिव श्री दत्तात्रय कंचलवार सर तसेच शाळेच्या सर्व सदस्यांनी मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये