ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

16 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने “होय मी घडविते उद्याचा भारत”चे आयोजन

मातृशक्तीचा सन्मान सोहळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधूनFEEL THE BEET DANCE STUDIO व नवसंकल्प प्रतीक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “होय मी घडविते उद्याचा भारत” मातृशक्तीचा सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक 16 मार्च २०२५ रविवार रोजी नगरपरिषदेच्या नवीन सभागृहात करण्यात आलेले आहे, सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंचक्रोशीतील महिलांचा सन्मान करण्यात येऊन त्यांनी भावी आयुष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा छोटासा प्रयत्न आयोजक प्रतीक्षा कुलकर्णी- देव उपाध्ये यांचे कडून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष श्रीमती नंदाताई कायंदे राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. राजश्रीताई प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे मातृशक्तीचा सन्मान सोहळ्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रतीक्षा कुलकर्णी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये