ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यानिकेतन इंग्लीश स्कूलचे नवोदय परीक्षेत यश

तालुक्यातुन फक्त एकाच विद्यार्थ्यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील शेणगाव येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांने नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करत नवोदय साठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.

सोहम मोनेश्वर पांचाळ हा विद्यार्थी नवोदय परीक्षेत बसला होता. सदरील विद्यार्थ्यांने नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करत नवोदय साठी स्वतःला सिद्ध केले आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार तसेच शिक्षक बंडू चंद्रागडे, आशिष उमरे अविनाश भदाडे, पंकज जाधव, कोयल पवार, सुकेशनी चंद्रागडे, नेहा रापूसिया आदींनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना सातत्याने स्पर्धा परीक्षेसाठी प्रविष्ट करून त्यांची परिपूर्ण तयारी करून घेत येत असते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये