ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागरिकांनी सतर्क राहावे : ठाणेदार संतोष महल्ये

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 पोलिस स्टेशन देऊळगाव राजा हदितील सर्व नागरिकांना पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सैलानी बाबा यात्रा सुरू झालेली आहे ,तसेच उन्हाळी सुट्या सुरू होत आहे आहे तरी नागरिकांनी आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी..

दिवसा घरफोडी होण्याची शक्यता नाकारत येत नाही, घराला कुलूप लावून जाताना घराला पडदा लावावा.

सोने पॉलिश करून देणारे कोणी फिरत असतील तर अशा माणसाला घरामध्ये घेवू नये असा कोणी व्यक्ती संशयित फिरत असेल तर पोलिस स्टेशन ला कळवावे

बँक मधे पैसे टाकणे किव्हा काढणे असल्यास आपली बॅग, पर्स,थैली याचा कडे विशेष लक्ष ठेवावे कुणाच्या भूल थापाना बळी पडू नये.

रात्रीच्या वेळेस चोर महिलांचे आवाज काढून दरवाजा उघडण्यास सांगतात नंतर घरामध्ये प्रवेश करून चोरी करतात.

आपल्या फोर व्हिलर ,टू व्हिलर वाहनामधे डीकी मधे आपल्या मोल्यवान वस्तू ठेवू नये

कोणत्याही महाराजाची वेषभूषा असलेला किव्हा अनोळखी व्यक्तीना घरामध्ये घेवू नये

बस मधे चढताना उतरतांना महिलांनी आपली पर्स जपून ठेवावी तसेच पुरुषांनी आपल्या खिशामध्ये पैसे जपून ठेवावे

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी आपले दुकान ,घर याठिकाणी सी सी टी वी कॅमेरे लावावे. असे आवाहन पोलिस स्टेशन, देऊळगाव राजा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये