ताज्या घडामोडी

महिलांच्या नेतृत्वाला सुवर्णसंधी – माजी मंत्री शोभाताई फडणवीस

महिलांच्या आरोग्य समस्यांवर कार्यशाळा संपन्न - चंद्रपूर - गडचिरोली ब्राम्हण सभेतर्फे महिलादिनाचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभा महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक रेड क्रॉस भवन येथे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या तज्ञांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते.

ह्याप्रसंगी अध्यक्षस्थाहून मनोगत व्यक्त करताना राज्याच्या माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेत्या व प्रसिद्ध समाजसेविका शोभाताई फडणवीस ह्यांनी महिलांनी प्रगतीचे शिखर गाठत आहेत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्रात विशिष्ट प्रतिमा निर्माण करत आहे. महिलांनी ज्या-ज्या क्षेत्रात पाऊल टाकले त्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण करून समाजाला नेतृत्व प्रदान केलेले असल्याचे प्रतिपादन केले. भविष्यातही महिलांनी समाजकारणामध्ये एकत्रित येऊन अधिक गतीने कार्य करावे, असेही आवर्जुन सांगितले.

प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या डॉ. यामिनी पंत यांनी महिलांनी स्तन कर्करोगाबद्दल कसे जागृत राहावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. कीर्ती साने यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबत जनजागृती होण्यासाठी सुशिक्षित महिलांनी पुढाकार घेऊन कार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जया भारत यांनी भारतीय संस्कृती व पाश्चात्य संस्कृतीवर ह्यामधील फरक, आजच्या काळात भारतीय संस्कृतीबाबत जाणूनबुजून पसरविण्यात येत असलेले गैरसमज व आपल्या पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन ह्या बाबत माहिती दिली. जेष्ठ समाजसेविका डॉ. नंदिनी देवईकर यांनी महिलांना संघटित होणे काळाची गरज आहे, असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सुवर्णा महेश यार्दी यांनी मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या ब्राह्मण सभेच्या कार्याची ओळख करून दिली. संचालन समिक्षा सरुळकर, स्वागत गीत अपर्णा घरोटे यांनी गायले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता संगीता भट्टलवार यांनी केली. उत्कृष्ट रांगोळी अश्विनी कांत यांनी रेखाटलेली होती. आभार प्रदर्शन जागृती फाटक यांनी केले.

सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थित राहुन मार्गदर्शक वैद्यकीय तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक शंका कुशंकाचे निराकरण केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता वैशाली अलोणी, शरयू मैत्र, सीमा रुपदे, माधवी मसादे, स्मिता देशपांडे, स्नेहा जोशी, साक्षी सांबरे, शिल्पा देशकर, तांबेकर, कुळकर्णी, पुराणिक, वनकर, मीना देशपांडे ह्यांसह समाजातील महिला भगिनींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये