ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

०३ आरोपी व ०२ विधी संघर्षीत बालक ताब्यात ; संपूर्ण मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांचे शेतातील वराह फार्ममधील वराह (डुकर) चोरीचा गुन्हा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन देवळी येथे फिर्यादी शेतकरी प्रविण रिठे, रा. पिपंळगाव लुटे ता. देवळी जि. वर्धा यांनी तकार दिली कि, त्यांचे शेतातील वराह फार्ममधील वराह डुकर हे दिनांक ०३.०३.२०२५ चे रात्रदरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेले अश्या तकारीवरून पोलीस स्टेशन देवळी येथे अप. क्र. १६४/२५ कलम ३०३ (अ) बीएनएस २०२३ चा दाखल असुन तपासावर आहे.

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन समांतर तपास करीत असतांना गोपणिय माहितीवरून ईसम नामे १) अक्षय मारोतराव खाडे, वय २४ वर्ष, रा. गणेशनगर बोरगांव मेगे, वर्धा २) बबलु उर्फ मैना शंकर धोत्रे, वय २३ वर्ष रा. वडर वस्ती, बोरगांव मेघे, वर्धा, ३) पंकज उर्फ गोगा दामोधर घुगे, वय २३ वर्ष, रा. गणेशनगर, वार्ड नंबर ३, हनुमान मंदीर जवळ, जिल्हा वर्धा व ०२ विधी संघर्षित बालक यांना वराह (डुकर) बाबत विचारपुस केली असता त्यांनी ०३ मोटर सायकलनी चार ते पाच दिवसा पुर्वी रात्र दरम्याण वर्षेवरून अंदाजे ३० कि.मी. अंतरावर असलेल्या एका खेडेगांवातील शेतातुन वराह पालनाच्या गोठ्यातील ०६ वराह (डुकर) ची चोरी केली व ०६ वराह (डुकर) यांना सेवाग्राम येथील समतानगर, वरूड या भागात खाली प्लॉटमधील गटार पाहून सोडले आहे अशी माहिती दिली व ते चोरीतीलच असल्याची खात्री पटल्याने त्यांचे ताब्यातुन १) एक पांढऱ्या रंगाची हिरो डेस्टीनी प्राईम कंपनीची मोपेड गाडी जिच्या एम. एच.३२ ई.व्ही. ७४३४, २) एक अॅन्ड्राईड मोबाईल, ३) एक काळया रंगाची सुजूकी कंपनीची वर्गमॅन मोपेड गाडी जिच्या एम.एच.३२ ए.यु. ५७९४, ४) एक रेड मी कंपनीचा मोबाईल ५) ०६ जिवंत वराह (डुकर) प्रत्येकी किंमत ८,०००/- रू प्रमाणे ४८,०००/- रू, ६) एक जुनी वापरती होंडा कंपनीची शाईन काळया रंगाची नोंदणी क्रमांक एम.एच.४० सी.बी ८५५४, ७) विवो कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल असा एकुण जु.कि. ३,१३,०००/- रू. चा माल मुद्देमाल गुन्हयाचे पुरावकामी जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोउपनि अमोल लगड, पो. हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, पो. अंमलदार अमोल नगराळे, गोपाल बावनकर मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये